फलटण :: मागील २-३ महिन्यांत काही अडचणीमुळे मला वेळ देता आला नाही . आता मी गावोगावी बैठका घेऊन लोकांनाच विचारणार ‘ आमचं काय चुकलं ते सांगा ? जे चुकलं ते दुरुस्त करू मात्र आमचं जे चुकलं असेल त्याहीपेक्षा तुमच्यापुढे जे नेतृत्व तयार होत आहे ते नेतृत्व तुम्हाला तुमच्या पिढीसाठी लाभदायक नाही आम्ही शून्यातून राजकारणाची सुरुवात केली होती . कार्यकत्यांनीही साथ दिली . मी हार मानणारा माणूस नाही , बिघडलेली राजकीय परिस्थिती बदलण्याबरोबर तालुक्याची बसवलेली घडी कोणालाही विस्कटू देणार नाही , असा इशारा विधान परिषदेचे माजी सभापती आ . रामराजे ना . निंबाळकर यांनी दिला . कुरवली , ता . फलटण येथे बाणगंगा धरण पाणी पूजन प्रसंगी ते बोलत होतेआ रामराजे म्हणाले , विधानसभेला आपला उमेदवार पडला असला तरी राजकारणातील आपला मूलभूत पाया आजही मजबूत आहे . तरुणांना भूतकाळातील दुष्काळी परिस्थितीची , विपरीत परिस्थितीत केलेल्या संघर्षाची जाणीव करून देण्याची गरज आहे.आमच्याकडून तसेच आमच्या कार्यकर्त्याकडून काही चुका झाल्या असतील . झालेल्या चुका दुरुस्त करून आपणाला पुढे जायचं आहे . तरुण पिढीचा मी पाठीराखा आहे . त्यांना सोबत घेऊन आपणाला पुढे जायचे आहे . सामाजिक कार्यकर्त्यांना थोडा वेळ द्यावाच लागतो . कोणीतरी म्हणतं रामराजेंनी पाण्यासाठी काय केल ? मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की मी पाण्यासाठी काय केलं नाही ते सांगा ? एमआयडीसीसाठी काय केलं ? कमिन्समध्ये ६ हजार लोक काम करतात हेच त्याचे उत्तर . उलट खूपजन कमिन्सला टाळे ठोकायला निघालेत . मी पैसे खाल्ल्याचा आरोप करत आहेत . काहीही बोलतात . हार मानणारा हा माणूस नाही , आता संघर्ष करणार शून्यातूनच राजकारण निर्माण केलं होतं . काही कारणामुळे लोकांमध्ये मला जाता आलं नव्हतं . आता मात्र प्रत्येक गावात राजकारण विरहित बैठका घेऊन विकासाची भुमीका समजवून सांगणार आहे .आमच्यातून गेलेले ३-३ तास झाडू मारत असतात . मतं मिळवण्यासाठी नव्हे तर जनतेसाठी आम्ही कामं केली . मी हे केलं , ते केलं , असं जे विरोधक म्हणतात ना त्याचा ९ ० टक्के पाया मी घातला आहे .



