फलटण वाठार नि.-वाठार हायस्कूल वाठार निं. येथे S.S.C.बॅच 2006-2007 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा (गेट टुगेदर) संपन्न झाला.
गेल्या 19 वर्षापासून भेटीसाठी शिक्षक विद्यार्थी आतूर झाले होते. या विद्यार्थी यांना वर्ग शिक्षक लाभलेले गुरुवर्य, तसेच वर्गशिक्षक मा . शारदा देवी कदम मॅडम यांनी मार्गदर्शन त्या वेळी केले.
याच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संस्काराने घडलेली ही पिढी एका विचाराने एकत्र आली. शाळेत खेळलो, बागडलो, ज्ञान घेतले त्याच शाळेत जुन्या आठवणीना उजाळा मोठ्या उत्साहात मध्ये साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाला उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग सर्व माझी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळे रूप आले आणि सर्वांच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. 19 वर्षापूर्वीची परिस्थिती ही फार वेगळी होती व आता प्रौढ स्थितीतील ही वेगळी आहे. या आगोदर विद्यार्थी म्हणून होतो. व आता 19 वर्षानंतर माझी विद्यार्थी म्हणून एकत्र वेगळेच रूप पाहायला मिळाले, या वेळी काही शिक्षक मंडळींनी ही आपली या बॅचच्या संदर्भातील मनोगत व्यक्त केले. या गेट-टुगेदर च्या कार्यक्रमामुळे आपण कुठे आहे आणि आपले मित्र मैत्रिणी कुठे आहेत, कोणत्या पदावर ते काम करत आहेत, हे एकमेकांना अवगत झाले, हा कार्यक्रम काही तासात च संपेल असे वाटले पण जुन्या आठवणी मनामध्ये निर्माण जाग्या झाल्या या गेट-टुगेदर च्या कार्यक्रमासाठी सर्वांना एकत्रित आणण्याचे काम ते म्हणजे –
सागर मोहिते, निलेश निंबाळकर, सागर घोलप, अनिल जगताप, अमोल माने, अविनाश ननावरे, किशोरी पवार, प्रकाश म्हेत्रे, तोसिफ शेख, स्वप्नाली निंबाळकर, अनुजा मुळीक, स्वप्नील मुळीक, गणेश धायगुडे.
मुख्याध्यापक मा श्रीमंत घोरपडे सर तसेच, शिवाजी शिंदे सर, जाधव सर, मोटे मॅडम तसेच सोनवलकर मामा आणि हंबीरराव मोहिते मामा या सर्वांनी मनोगत वेक्त केले.
कार्यक्रमाचे व्यासपीठ सांभाळण्याची काम केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश निंबाळकर यांनी केले नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे संस्थाध्यक्ष मा श्री . सह्याद्रीभैय्या चिमणराव कदम तसेच वाठार निंबाळकर गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच मा सौ. सुवर्णताई नंदकुमार नाळे उपस्थित होते.
गेट-टुगेदर चा कार्यक्रमात उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. भोजनाचा आस्वाद सर्वांनी मिळून घेतला आणि या कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमात सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देऊन मनोगत व्यक्त केली आपली कौटुंबिक प्रगती आणि मुलांनी सध्या कार्यरत असलेल्या पदाचा परिचय दिला
आपली कौटुंबिक प्रगती आणि मुलाना केलेले शैक्षणिक कार्यात केलेली उच्च प्रगती यावर ही बोलण्यात आले. शाळेमध्ये घडलेल्या विद्यार्थ्यांच्या शेतात अनुभवांचा महापौर करून एकच हास्य कलमाला मनोगत व्यक्त केली व्यापार, व्यवसाइक, नोकरदार यांनी आपण गाठलेल्या टप्प्यावर अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमात माजी विद्यार्थी कडून शाळेला आणि हसत खेळत विज्ञान तसेच एआई टेक्नॉलॉजी द्वारे सर्व शाळेतील मुलांना vertual session ठेवला तसेच शाळेला छोटी भेट वस्तु दिली.कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे आभार स्वप्नाली निंबाळकर यांनी मानले.



