By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: पहलगाम दहशतवादी हल्ला : सरकारने घेतलेल्या निर्णयांना सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला ; आता निर्णयांची प्रतिक्षा- शरद पवार —
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > राजकीय > पहलगाम दहशतवादी हल्ला : सरकारने घेतलेल्या निर्णयांना सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला ; आता निर्णयांची प्रतिक्षा- शरद पवार —
राजकीय

पहलगाम दहशतवादी हल्ला : सरकारने घेतलेल्या निर्णयांना सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला ; आता निर्णयांची प्रतिक्षा- शरद पवार —

Prashant Ahiwale
Last updated: April 26, 2025 9:40 am
Prashant Ahiwale Published April 26, 2025
Share
SHARE

फलटण:- जम्मू – काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला दिलेला संदेश योग्य आहे . अशा निर्णयात सर्वपक्षीय सरकारसोबत असले पाहिजेत , परंतु सरकारने कोणताही निर्णय घेताना त्याचा भारतावरच उलटा परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी , असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष , माजी केंद्रीय संरक्षणमंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले . ते आंबोली नांगरतास येथील वसंतदादा पाटील ऊस संशोधन केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते . यावेळी त्यांनी पर्यटकाला धर्म विचारून मारणे हे भयंकर कृत्य असल्याचे सांगितले . पवार गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते . शुक्रवारी त्यांनी आंबोली नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्राला भेट देऊन संशोधकांशी चर्चा केली . त्यानंतर ते पत्रकारांशी बोलले . यावेळी माजी मंत्री प्रवीण भोसले , जिल्हा बँक माजी संचालक व्हिक्टर डान्टस , कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही . बी . पाटील , ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख अधिकारी प्रभाकर देशमुख उपस्थित होते

पवार म्हणाले , मी गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे . गुरुवारी वेंगुर्ला येथील फळ संशोधन केंद्राला भेट दिली . तेथे काजूवर नवनवीन प्रक्रिया उद्योग उभे राहत आहेत , ही भूषणावह बाब आहे . काजू पिकांबाबत जनतेत किती उत्साह आहे , हेही तपासून घेतले पाहिजे . संशोधनाचे काम चांगले सुरू आहे . जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्याबाबत पवार यांनी चिंता व्यक्त केली . ते म्हणाले , धर्म विचारून एखाद्या पुरुषाला मारणे म्हणजे परिस्थितीचे गांभीर्य ओळखले पाहिजे . जे काही लोक धर्माबाबत अधिक बोलतात , त्यांनाच सरकार पाठिंबा देते हे योग्य नाही . पहलगाममध्ये घडलेल्या घटनेनंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती . या बैठकीला आमच्या पक्षाकडून लोकसभेतील नेत्या सुप्रिया सुळे यांना पाठवण्यात आले होते . त्यामुळेच सरकार जो काही निर्णय घेईल , त्याला आम्ही पाठिंबा दिला आहे आणि सर्वजण सरकारसोबत आहोत . कारण हा हल्ला भारतावर झालेला आहे . त्यामुळेच सरकारला पाठिंबा देणे गरजेचे आहे . परंतु , सरकारने

पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे आणि को निर्णय घेतल्यास तो तडीस न्यावा , असे आवाहन पवार यांनी केले . पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानवर काही निर्बंध लादले आहेत . परंतु , हे निर्बंध लादताना सरकारने थोडा विचार केला पाहिजे . भारताची विमानसेवा जर पाकिस्तानमधून जात असताना बंद केली , तर त्याचा परिणाम भारतावरच होईल . असे अनेक निर्णय आहेत , परंतु यातून पाकिस्तानलाही एक संदेश जाईल , असे पवार म्हणाले

You Might Also Like

वक्फ बोर्डाच्या जागेच्या नियंत्रणासाठी नवीन विधेयक मात्र स्वतःच्या जागेच काय..? – जांबुवंत मनोहर यांचा सवाल  

मंगळवार पेठेतील बौद्ध अनुयायी व जनतेतुन वाढता प्रतिसाद पहाता सौ अनिता प्रशांत काकडे यांनाच उमेदवारी मिळेल असेच सध्या तरी दिसते!

सत्ता पक्षात असलेल्या ह्या आमदाराने पोलिसानंबाबत स्पष्टच सांगितले … साम .. Sanjay Gaikwad : महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट कुठेच नाही ; पकडतात 50 लाख आणि दाखवतात 50 हजार

अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात श्रीमंत रामराजेंचे बॅनर झळकले

रेशनदुकानदारांना अजित पवारांकडून गिफ्ट, कमिशनमध्ये घसघशीत वाढ; मंत्रालयातील बैठकीत निर्णय

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
क्राईम

महात्मा ज्योतीबा फुले यांच्या नामफलकाच्या विटंबनेप्रकरणी फलटणमध्ये निदर्शने

Prashant Ahiwale Prashant Ahiwale August 6, 2025
पंढरपूर ते घुमाण संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे फलटण मध्ये रविवारी आगमन : मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य स्वागत : 150 सायकलस्वार सहभागी : रथयात्रा 5000 कि . मी . व सायकल वारी 2500 कि . मी . करणार 8 राज्यातून प्रवास
लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला
सदोष वीज मीटर तपासण्याची व्यवस्था होईपर्यंत स्मार्ट मीटर बसवू नयेत ; आमदार शेखर निकम यांनी अधिवेशनात केली आग्रही मागणी
गहाळ 75 मोबाईलचे शहर पोलिसांकडून तक्रारदारांना वितरण
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account