महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट कुठेच नाही ; पकडतात 50 लाख आणि दाखवतात 50 हजार , शिवसेना आमदाराचा आरोप महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही , पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात , असा आरोप शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलाय . ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते , त्यावेळी आमदार गायकवाड यांनी हे आक्षेपार्ह विधान केलंय . दरम्यान यावेळी त्यांनी पोलीस खात्यातील भ्रष्टाचारावर भाष्य केलंय . सरकारने एक कोणता कायदा केला की , पोलिसांचा एक हप्ता वाढत असतो , असेही ते म्हणालेत . पत्रकार परिषदेत बोलताना संजय गायकवाड यांनी पोलीस खात्यात भ्रष्टाचार चालत असल्याचा आरोप पोलीसांनवर उघडपणे केला
जर सरकारने कायदा केला तर पोलिसांचा एका हप्ता वाढतो . जर गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो . दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढत असतो . पण जर पोलिसांनी ठरवलं की , एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही . तर सगळं सुतासारखं सरळ होईल , असं गायकवाड म्हणालेत . दरम्यान संजय गायकवाड यांच्या मुलाला निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती . त्यावरून बोलताना आमदार गायकवाड म्हणाले , मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाचा पहाडाला पार करावं लागेल . त्यावरून त्यांनी पोलिसांवर तोफ डागली आणि पोलीस अकार्यक्षम असल्याची टीका केली



