मुंबई:-स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने चालू वीज मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरु केले आहे . मात्र , बदललेले मीटर जलद रिडींग दाखवत असल्याने ग्राहक तक्रार घेऊन महावितरण कार्यालयात गेल्यानंतर तपासण्याची मीटर कोणतीच सुविधा महावितरण कंपनी आणि ठेकेदार कंपनीकडे नाही . त्यामुळे जोपर्यंत सदोष मीटर तपासण्याची व्यवस्था महावितरण कंपनी किंवा ठेकेदार कंपनी करत नाही , तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवू नयेत , अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी नुकतेच पावसाळी अधिवेशनात केली .
ऊर्जा विभागावरील चर्चेदरम्यान आमदार निकम यांनी विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले . शहरातील विद्युत वाहिनी पोलवरून दिलेली असल्याने ऊन , वादळ , वारा आणि विशेषतः पोलवरील विद्युत पुरामुळे या वाहिन्यांपासून नैसर्गिक आपत्तीच्या काळात मोठा धोका निर्माण होतो . विद्युत पोलवरील तारा तुटून पडल्याने विजेचा झटका बसून माणसे तसेच जनावरांचा नाहक बळी जातो , वीजपुरवठा खंडित होतो . या घटनांनंतर शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अनेकवेळा उशिरा मिळते किंवा काहीवेळा मिळतदेखील नाही . म्हणूनच चिपळूण शहरातील सर्व विद्युत वाहिन्या तत्काळ भूमिगत करण्यात याव्यात . वाडीवस्ती , शाळा , बाजारपेठ आणि रस्ता क्रॉसिंग वीज वाहिन्यांना गार्डीग किंवा स्पेसर देण्यात यावेत
महावितरण कंपनीकडे निधी उपलब्ध नसतो , तेव्हा ग्राहकाला स्वखर्चातून कनेक्शन दिले जाते .ग्राहकाने केलेला खर्च महावितरण कंपनी दरवर्षी समान ५ हप्त्यात देते . त्यामध्ये कोणतीच सव्र्व्हस ग्राहकांना देत नसताना सर्व्हस कनेक्शन चार्जेसच्या नावाखाली लाखो रुपये कपात करते . मात्र , ग्राहकाने सर्व कामे स्वखर्चान केलेली असल्याने हे पैसे अदा करू नयेत व ग्राहकाला केलेला खर्च ५ हप्त्यात न देता एकाचवेळी देण्यात यावा , अशी मागणी केली आहे



