फलटण : दिनांक १७ सप्टेंबर ~ ‘ गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ , फलटण यांचा ३० वा वर्धापन दिन आज अनंत मंगल कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
फलटण तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी, महिला भगिनी तसेच तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे उद्दिष्ट ठेवून गोविंद मिल्कने गेली तीस वर्षे उत्कृष्ट सेवा बजावली आहे.
३० वर्षांपूर्वी लावलेले हे छोटेसे रोप आज वटवृक्षाच्या रूपात बहरताना दिसत आहे. दूध उत्पादनवाढीसोबतच विविध प्रकारची दुग्धजन्य उत्पादने सुरू करून, पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड देत गोविंद मिल्क आज देशपातळीवरील एक उत्कृष्ट ब्रँड म्हणून नावारूपाला पोहोचले आहे.
या यशामागे श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर (वहिनीसाहेब) यांचे व्यवसायातील प्रामाणिक समर्पण, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचे कल्पक नेतृत्व, श्रीमंत सौ. मिथिलाराजे सत्यजीतराजे नाईक निंबाळकर (वाहिनीसाहेब) यांची साथ आणि या ब्रँड चे शिल्पकार ~ ( MAN BEHIND THE BRAND ) ~ मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचे उत्तम व्यवस्थापन हे सर्व घटक तितकेच महत्वाचे ठरले आहेत. यासह गोविंद परिवारातील सर्व सदस्य, दूध उत्पादक शेतकरी व हितचिंतक यांचे योगदान अनमोल आहे.



