संतकृपा डेअरी मालक श्री विलास नामदेव नलवडे आणि व्यवस्थापक श्री मारुती रणदिवे यांच्या निषेधार्थ मारुती मंदिर आळजापूर येथे ग्रामस्थ व महिलावर्ग यांनी एकत्र येऊन आळजापूर गावातील निलेश जगताप या तरुणावर राजकीय सुडबुद्धितून झालेल्या अन्यायावर व लोकांवर सतत होणाऱ्या अन्याया विरुद्व आवाज उठवला .
श्री.निलेश भरत जगताप रा.आळजापूर या व्यक्तीवर दि.25/04/2025 वार शुक्रवार या दिवशी लोणंद पोलीस स्टेशन येथे संतकृपा डेअरी मध्ये चौदा लाखाचा फ्रॉड केला असा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावरती कलम 316(4),318,316(3) अशा प्रकारची खोटी कलमे लावून चीटिंगची केस करण्यात आली आणि गुन्हा हा सुट्टीचा वार बघून शुक्रवारी दाखल करण्यात आला. निलेश जगताप यांना शुक्रवारी पोलीस स्टेशनला प्राथमिक चौकशीसाठी बोलवले आणि तो आल्यावरती दुपारच्या दरम्यान गुन्हा दाखल करून लगेच घाई गडबडीने अटक केली. निलेश हा संतकृपा डेअरी मध्ये निरगुडी येथे चिलिंग सेंटरवरती दूध गोळा करण्यासाठी सुपरवाईजर म्हणून कामाला होता. त्याने चार,पाच महिन्यापूर्वी काम सोडून सर्व हिशोब पुर्ण(Nill) करून स्वतःचा दुधाचा व्यवसाय चालू केला, निरगुडी गावामध्ये तो 1600 लीटर चे दूध संकलन करून तो कन्हैय्या डेअरी येथे दूध घालायचा. त्याने स्वतःचे चिलिंग सेंटर चालू केल्यामुळे व आमचे दूध फोडल्यामुळे संतकृपा डेअरी चे चेअरमन विलासराव नलवडे यांनी त्याचा धंदा बंद व्हावा व त्याचे कुटुंब उध्वस्त व्हावे या आकसा पोटी, सत्तेचा गैरवापर करून मारुती रणदिवे यांच्या करवी हे षडयंत्र घडवून आणले.त्यांनी स्वतःच्या राजकीय संबंधाचा गैरवापर करून दबावाने गुन्हा दाखल केला. निलेश जगताप व त्याच्या कुटुंबा वरती झालेल्या अन्याया विरुद्ध आज आळजापूरकरांनी एकजुटीने आवाज उठवलेला आहे त्यास लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास समस्त ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सातारा याठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला .
आळजापूर ता.फलटण हे गाव बीड होण्याच्या मार्गावर…!
Leave a comment



