फलटण प्रतिनिधी – दरवर्षी महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट काम करणारे व निष्कलंक सेवा बजावणारे अधिकारी व यांना पोलीस अंमलदार महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह हे पदक देवुन गौरवण्यात येते . यावर्षी फलटण उपविभागाचे , उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना हे पदक जाहीर करण्यात आलेले आहे .
राहुल धस यांची सन 2016 मध्ये राज्य सेवा परिक्षेमार्फत पोलीस उपअधीक्षक म्हणुन निवड झाली असुन त्यांनी पोलीस दलात रुजु झालेपासुन प्रथम परिवेक्षाधीन कालावधीत आकोला येथे पुर्ण केला आहे . त्यानंतर उमरगा जि . धाराशिव , अंबेजागाई परळी जि . / बीड . दौड जि . पुणे ग्रामीण येथे उत्कृष्ट कामकाज केले असुन त्यामध्ये आजवर अनेक गुन्हयांचा तपास करुन उघडकीस आणून त्यामधील आरोपींना शिक्षा लावलेली आहे . त्यापैकी केज ( बीड ) येथील खुनाच्या गुन्हयामध्ये 5 लोकांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे . तसेच मागील आठवडयात अंबेजोगाई येथील बालकांचे लैंगीक अत्याचारातील
ठोठवण्यात शिक्षक आरोपीस जन्मठेपेची शिक्षा आलेली आहे . उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी तुळजापुर बंदोबस्त , मा . पंतप्रधान बंदोबस्त , कोरेगाव भिमा बंदोबस्त व इतर महत्वाचे बंदोबस्त अशा बंदोबस्तामध्ये काम करुन त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होवु देता त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले आहे . या त्यांचे आज पर्यंतचे उत्कृष्ट कामकाजाची दखल घेवुन मा . केंद्रीय गृहमंत्री यांनी यापुर्वी राहुल धस यांना केंद्रीय दक्षता पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे . तसेच याच कामाची दखल घेवुन मा . पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी राहुल धस उपविभागीय
पोलीस अधिकारी , फलटण उपविभाग फलटण यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह हे पदक जाहीर केलेले आहे . तसेच सातारा जिल्हयातील 6 पोलीस अंमलदार यांना सदरचे सन्मान चिन्ह पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांचेकडुन जाहीर करण्यात आलेले आहे . राहुल धस यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळालेबददल समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा , श्रीमती डॉ . ‘ वैशाली कडुकर अपर पोलोस अधीक्षक सातारा , फलटण उपविभागातील सर्व प्रभारी अधिकारी , दुय्यम अधिकारी व सर्व पोलीस अंमलदार यांनी त्यांचे अभिनंदन केले



