फलटण – फलटण येथे काल मा. खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी कमिन्स या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत फलटण येथील गेस्ट हाऊस या मधील पश्चिमेकडे असलेल्या खोली क्रमांक ३ मध्ये बंद दाराआड चर्चा केली आहे… नेमकी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे… घडलेला प्रसंग असा की; काल अचानक सुरुवातीस फलटण प्रांत अधिकारी सौ. आंबेकर मॅडम यांच्यासहित कमिन्स चे अधिकारी यांच्यासोबत फलटण कोरेगाव चे आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तहसील कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी कमिन्स च्या अधिकाऱ्यांना कंपनीत चाललेल्या कारभाराबाबत धारेवर धरले. यामध्ये विरोधकांच्या शिफारसी वरून कामावर घेत असल्याचा विषय पुढे घेत कमिन्सच्या अधिकाऱ्यांना खडसावले गेले… त्यासोबत पगाराचा मुद्दा उपस्थित केला… मुलांना दुसऱ्यांच्या पाया पडून कामाला लावण्याची पद्धत बंद करणार आहेत का नाही… यासोबतच कमिंस मधील स्क्रॅप इतर कॉन्ट्रॅक्ट फलटणमधील इतर कुणाला व्यक्तींना देण्यात यावे.. आमचे पूर्वीचे व्यवहार चांगले असतानाही आम्हाला देण्यात आलेले कॉन्ट्रॅक्ट कंपनीने बंद का केले? असा प्रश्न साखरवाडीचे मा. सरपंच यांनी उपस्थित केला.. तसेच पाणी टंचाई बाबतही आमदार व मा. खासदारांनी प्रांताधिकारी सौ आंबेकर यांच्यासहित पत्रकारांबरोबर चर्चा केली. जनावरांना जून अखेरपर्यंत चारा पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. या या बैठकीनंतर मात्र पुन्हा कमिन्स अधिकाऱ्यांसोबत तहसील कार्यालयाच्या समोर असलेल्या फलटण विश्रामगृह म्हणजेच गेस्ट हाऊस येथील मोठ्या इमारतीमध्ये बैठक घेण्यात आली. त्या गेस्ट हाऊसच्या इमारतीमधील पश्चिमेकडे असलेल्या खोली क्रमांक ३ मध्ये बंद दाराच्या आड कमिन्स अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याचे नेमके कारण काय हे मात्र समजू शकले नाही.. यामुळे बंद दाराच्या आड झालेली चर्चा गुलदस्त्यात आहे…



