फलटण प्रतिनिधी..: फलटण शहर हे ऐतिहासिक शहर असून मुळातच शहराला वेगळी ओळख आहे तसेच रस्ते इतर सुविधांमुळे फलटण शहर हे आधीपासूनच प्लॅनर शहर म्हणून ओळखले जाते. विकास साधायचा असेल तर फलटणची बारामती करण्यापेक्षा ऐतिहासिक फलटण शहराचा विकास साधून फलटणची वेगळी ओळख निर्माण करावी असे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी बिल्डर असोसिएशनच्या २०२५- २६ पदाधिकारी पदग्रहण समारंभाच्या कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार सचिन पाटील, फलटण नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर,बिल्डर असोसिएशन इंडिया महाराष्ट्रचे चेअरमन जगन्नाथ जाधव फलटण बिल्डर असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्र जाधव, सेक्रेटरी मंगेश शिंदे, उपाध्यक्ष सागर शहा, खजिनदार विकास म्हेत्रे, संयुक्त सहसचिव सुहास सस्ते, कौन्सिल सदस्य किरण दंडिले,कार्यकारणी समितीचे रणधीर भोईटे, प्रमोद निंबाळकर,दिलीप शिंदे,दत्तात्रय बोबडे,राजेंद्र निंबाळकर,व्ही.एन. जाधव,मुकेश कोळेकर, नितीन बोबडे, आर.एस.माने,अंकुश गिरमे,तुषार खिलारे राजीव नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना संजीवराजे म्हणाले फलटणच्या विकासात कोणीही राजकारण न आणता फलटण शहराचा विकास हा चौफेर झाला पाहिजे शहराचा विकास सर्वांनी मिळून साधला तरच फलटण शहराची वेगळी ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणाचा विचार करता शहरामध्ये नवीन इमारती रस्ते होत असताना शक्यतो जुनी वृक्ष वाचली पाहिजेत त्याचबरोबर नवीन वृक्षाची लागवड त्याच प्रमाणात झाली तरच भविष्यात पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही.
हिरोजी इंदुलकरांसारखा स्वतःचा ब्रँड फलटणच्या बिल्डरांनी तयार केला पाहिजे : माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर
बांधकाम क्षेत्रात NDM च्या विविध गाईडलाईन्स आल्या आहेत. हवामान बदलानुसार बांधकाम व्यवसायिकांनी इमारती उभ्या कराव्यात वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकामे करून इमारती बांधल्या पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगड सारखा किल्ला बांधून हिरोजी इंदुलकरांनी आपला स्वतःचा ब्रँड निर्माण केला होता त्याचप्रमाणे फलटणच्या बिल्डरांनी आपला स्वतःचा ब्रँड निर्माण करावा.फलटण मधील इमारती,एमआयडीसी, उद्योग,इन्फ्रास्ट्रक्चर या उत्तम दर्जाच्या बनवल्या पाहिजेत आपण बारामती शहराची बरोबरी करण्यापेक्षा त्यापेक्षाही सुंदर इमारती रस्ते तयार करून फलटण शहर राज्यात पुढे घेऊन जाण्याचे काम आपण सर्वांनी मिळून केले पाहिजे.
यावेळी आमदार सचिन पाटील व फलटण नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक किरण दंडिले यांनी केले तर आभार मंगेश शिंदे यांनी मानले
फलटणची बारामती करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन ऐतिहासिक फलटण शहराचा विकास साधून फलटणची वेगळी ओळख निर्माण करावी : श्रीमंत संजीवराजे ना निंबाळकर
Leave a comment



