टिफिन बॉक्समध्ये नॉन व्हेज अर्थात मांसाहारी जेवण आणल्याचा ठपका ठेवत तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांनी काढून टाकलं. शाळेच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांच्या आईंनी थेट उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल देत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले.



