By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून ” ; रणजितदादांच्या फलंकबाजीवर संजीवराजे बरसले . संजीवराजेंनी नाव न घेता माजी खासदारांना झापले .
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सातारा जिल्हा > फलटण > स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून ” ; रणजितदादांच्या फलंकबाजीवर संजीवराजे बरसले . संजीवराजेंनी नाव न घेता माजी खासदारांना झापले .
फलटण

स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून ” ; रणजितदादांच्या फलंकबाजीवर संजीवराजे बरसले . संजीवराजेंनी नाव न घेता माजी खासदारांना झापले .

Prashant Ahiwale
Last updated: January 12, 2026 9:36 pm
Prashant Ahiwale Published January 12, 2026
Share
SHARE

फलटण : ” ज्यांनी केवळ फलकावर आपले मोठे फोटो छापण्याचेच विकासकाम केले आहे , त्यांना जमिनीवरची कामे काय कळणार ? पालखी महामार्ग असो वा इतर रस्ते , हे सर्व सरकारी धोरण आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांचे नियोजन आहे . मात्र , इथे ‘ क्रेडीट ‘ लाटण्यासाठी लोकांची चढाओढ सुरू आहे . अति तिथे माती या म्हणीप्रमाणे विकासाचा गंध नसताना केवळ फलकबाजी करणाऱ्यांना आता आवर घालण्याची वेळ आली आहे , ” अशा कडक शब्दांत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता समाचार घेतला . काल ९ जानेवारी रोजी , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ . अनिल जगताप यांनी संजीवराजेंच्याउपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला . या मेळाव्यात संजीवराजेंनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि माजी खासदारांच्या फलकबाजीवर सडकून टीका केली . संजीवराजेंचे ‘ राजकीय ‘ बाण ‘ : जिल्हा नियोजन मंडळाचा संबंध काय ? संजीवराजे म्हणाले की , ” जिल्हा नियोजन मंडळाची कामे मंजूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषद सदस्य , कलेक्टर आणि पालकमंत्री यांचा असतो . यामध्ये खासदारांचा त्यांच्या फंडाशिवाय कोणताही संबंध नसतो . तरीही कामाचे नाव आणि ठिकाण माहीत नसताना केवळ ‘ यांच्या प्रयत्नातून ‘ असे मोठे फलक लावले जातात . जर आम्ही केलेल्या कामांचे बोर्ड लावले असते , तर रामराजे आणि दीपक चव्हाणांच्या बोर्डानी तालुका भरला असता . “स्मशानभूमीच्या कामावर लावलेल्या फोटोंचा उल्लेख करत संजीवराजे म्हणाले , ” फोटो कुठे लावावा याचेही भान राहिलेले नाही . स्मशानभूमीत दहन होताना तो फोटोही जळेल इतक्या जवळ फोटो लावला आहे . पुढच्यास ठेच मागचा शहाणा , या न्यायाने जनतेने आता ही फलकबाजी ओळखली आहे . ” विकासाचे श्रेय लाटण्याचा प्रकारः फलटण- आसू गिरवी रस्ता किंवा आदर्की रस्ता ही कामे आमदार दीपक चव्हाण यांच्या काळात आणि ‘ एशियन डेव्हलपमेंट बँक’च्या माध्यमातून झाली आहेत . त्याचे पुरावे आम्ही देऊ शकतो . मात्र , ज्यांना या कामांचा स्रोत माहीत नाही , ते आज मालकी हक्क सांगत फिरत आहेत . ‘ तालुका वाचवण्याची गरज ‘ ” तालुका सुसंस्कृतपणे पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे . पण जर कोणी श्रेयवादाच्या नावाखाली तालुक्याला मागे ओढत असेल , तर त्यांना वेळीच थांबवणे गरजेचे आहे . अन्यथा दिव्याखाली अंधार अशी आपल्या तालुक्याची अवस्था होईल , ” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला . या सभेने फलटणमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून , आगामी काळात ‘ दादा ‘ विरुद्ध ‘ राजे ‘ असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत .

You Might Also Like

बिहार मधील संघ्यस्थिती

श्रीमंत रामराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण नगरपरिषद निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून सुरू , राजे गटाच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित

स्वयम घोषीत गोरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?

फलटणमध्ये १८ डिसेंबरला राजे गटाची सांगता सभा ; गजानन चौकात आयोजन

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
सामाजिक

आंबेडकरी अनुयायी व निळा टोपीतील भिम सैनिक खंडु क्रष्णा रणदिवे अनंतात विलीन

Prashant Ahiwale Prashant Ahiwale May 29, 2025
बहुजन चळवळीचा आश्वासक चेहरा काळाच्या पडद्याआड !
पत्नीच्या नावे कंपनी काढून घेतली कोट्यवधी रुपयांची टेंडर जलसंपदा चा आका : कार्यकारी अभियंता अमोल निकम यांचा प्रताप ; गुन्हा दाखल करावा : सुशांत मोरे
फलटण संस्थानचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते महादेवाची महाआरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली.
बाळशास्त्री ना घराघरात पोहचवण्यासाठी प्रयत्न करू
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account