अनुबंध कला मंडळ, फलटणचा आगळावेगळा उपक्रम !
समाजात ५० वर्षाहून अधिक काळ उन्हातान्हात अखंडित कष्ट करत राहणाऱ्या कामगाराना वंदन!
” सन्मान अथक परिश्रमाचा “
वर्षानुवर्षे आपण आपल्या गावात राहात असतो… रस्त्याच्या आसपास छोटी-मोठी काम करणारे… कष्ट करणारे कामगार… कुणी चर्मकार , कुणी केश कर्तनकार.. कुणी स्वच्छक.. कुणी बर्फाचे गोळे विकणारा… कुणी धार लावणारा… अशी अगदी साधीसुधी काम करणारी अनेक माणसे आपल्या गरजांना धावून येतात. गरजेच्या वेळी आपण त्यांच्याकडे जातो, काम करून घेतो,पण नंतर हे सर्व आपल्या खिजगणती ही नसतात.
आपण नोकरदार वर्ग साधारणता ३५, ३६ वर्षापर्यंत काम करून सेवानिवृत्ती घेऊन आरामात जीवन जगत असतो , पण हे कामगार मात्र उन्हातान्हात, पावसात समाजासाठी कोणी ५० कोणी ६० कोणी ७०वर्षे अखंडित कष्ट करत राहतात. समाज उभारणीसाठी त्यांचे योगदान सहजी कुणाच्या लक्षात येत नाही.
असे अखंडित ५०वर्षे ६० वर्षे ६५वर्षे कष्ट करणारे कामगार अनुबंध कला मंडळाला दिसले… आणि वाटलं किती मोठे हे कष्ट… यांचे हे कष्ट अधोरेखित व्हायला हवे.त्यांचाही सन्मान, सत्कार करून कृतार्थता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे त्यासाठीच अनुबंध कलामंडळाने साकारला उपक्रम…
‘सन्मान अथक परिश्रमाचा!
२०२४ साली अशा कामगारांचा सत्कार करण्याचा पहिला कार्यक्रम अनुबंध कलामंडळाने यशस्वी केला. त्यानंतर यावर्षीचा तिसरा कार्यक्रम दिनांक १८ मे २०२५ रोजी जोशी हॉस्पिटलच्या सभागृहात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी सभापती विधान परिषद यांच्या हस्ते अशा अखंडित कष्ट करत राहणाऱ्या दहा कामगारांचा सत्कार शाल, पुष्पहार, मिठाई व अनुबंधकला मंडळातर्फे छोटीशी आर्थिक भेट चे पाकीट देऊन संपन्न करण्यात आला.
यामध्ये सन्मानित करण्यात आलेले कामगार…
लक्ष्मण देशपांडे, प्रकाश मोहिते, रत्नाकर कासार,रोहिदास सोनवणे, राजेंद्र विष्णू माने , श्रीमती सुगंधा जगताप , गुलाब इनामदार, हनिफ तांबोळी , बळवंत पाटील आणि श्रीमती आशा दरेकर .
अशा लोकांच्या सत्काराबाबत आम्ही जेव्हा श्रीमंत रामराजे यांच्याशी बोललो त्यावेळी त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून उत्स्फूर्तपणे दरवर्षी वेळ देण्याचे मान्य केले. गेली तीन वर्षे राम राजे या कार्यक्रमास आपला बहुमोल वेळ देऊन उपस्थित राहतात. यावर्षीही त्यांनी वेळात वेळ काढून या कामगारांचा सत्कार केला त्याबद्दल अनुबंधक कला मंडळ तर्फे आम्ही त्यांचे आभार मानतो.
यासाठी फलटण शहरातील अनेक मान्यवर आणि नागरिक उत्साहात हजर राहिले आणि त्यांनी या कामगारांना प्रोत्साहन दिले याबाबत अनुबंध कला मंडळ तर्फे सर्वांचे आभार मानण्यात येत आहेत. अशा आमच्या अनेक सामाजिक कार्यक्रमांना पाठबळ देणाऱ्या डॉक्टर जोशी यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
समाजात ५० वर्षाहून अधिक काळ उन्हातान्हात अखंडित कष्ट करत राहणाऱ्या कामगाराना वंदन !श्रीमंत रामराजे ना निंबाळकर
Leave a comment



