फलटण येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव समिती , सुजन फाउंडेशन यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रयाग सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष व मानवाधिकार संरक्षण समिती फलटण तालुका अध्यक्ष सौ . प्रीती संजय भोजने यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
सौ.प्रीती भोजने यांच्या सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक व अध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2025 देऊन गौरव केला . सदरचा सन्मान लोकजागर प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्वस्त सौ . अलका बेडकिहाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . यावेळी जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ , सामाजिक कार्यकर्ते संपतराव जाधव , ज्येष्ठ साहित्यिक ‘ सर्ज्या’कार सुरेश शिंदे , पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बापूराव सूळ , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचचे अध्यक्ष तुकाराम कोकाटे , सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते . सौ . प्रीती भोजने यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहेत



