येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता येत्या सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात राज्यात जिल्हा परिषद , नगरपालिका , महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील , दीड महिन्यात या सगळ्याच निवडणुका उरकल्या जातील . जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक एकत्र होईल , त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने ताकतीने काम करा , असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं आहे , ते सांगलीमध्ये आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते .



