फलटण ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे गायकवाड दाम्पत्यांचे वाचले प्राण.!

नीरा उजवा कालवा १५ फाटा सुरवडी येथे एक पुरुष व महिला Activa गाडीसह कॅनॉल मध्ये पडले असता सदर त्याच वेळेस फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे (साखरवाडी पोलीस चौकीचे)पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोहवा महादेव पिसे व पोलिस शिपाई अमोल देशमुख हे सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना नीरा उजवा कालवा १५ फाटा सुरवडी येथे आले असता एका दुचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे सुरेश गौतम गायकवाड व त्यांची पत्नी कोमल सुरेश गायकवाड हे वाहत्या पाण्याच्या कॅनॉल मध्ये पडले त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, महादेव पिसे अमोल देशमुख यांनी शेजारी असलेले माजी सैनिक धनंजय जाधव यांच्या मदतीने सदरची महिला व पुरुष व दुचाकी यांना सुखरूप बाहेर काढले यापूर्वीही धनंजय जाधव यांनी दोन वेळेस चार चाकी गाडी मधील माणसांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले आहे परंतु सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम यांना वारंवार तक्रार करूनही काहीही उपयोग होत नाही कारण फलटण बांधकाम विभाग म्हणजे फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.बांधकाम विभाग यांनी गतिरोधक तसेच कॅनॉलच्या पुलाच्या बाजूने सुरक्षा कठडे बसवणे गरजेचे आहे.बांधकाम विभागाचा गलथान कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.या ठिकाणी कुणाचा तरी जीव जाण्याची वाट पाहत आहेत. वेळीच उपायोजना न झाल्यास स्थानिक ग्रामस्थ बांधकाम विभागाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.



