फलटण । सातारा जिल्हा स्व . यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा जिल्हा आहे . राज्यामध्ये असलेल्या महायुती सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार नाही ; ते जनतेची दिशाभूल करत असून येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद , पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुका ताकदीने लढवा , असे निर्देश राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले
फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी येथे सदिच्छा भेटी प्रसंगी सपकाळ बोलत होते . यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके , शहराध्यक्ष पंकज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले की , महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व . यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून सातारा
देशामध्ये आहे . सातारा जिल्हा चव्हाण साहेबांच्या विचारावर मार्गक्रमण करणारा जिल्हा असून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे विचार हे सर्वसामान्य घरामध्ये पोहोचलेले आहेत . पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आगामी काळामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या योजनांचा पर्दाफाश करावा
यावेळी फलटण तालुकाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – – बेडके यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा यथोचित सन्मान केला .



