फलटण , दि . ६ ऑक्टोबर : फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद ‘ सर्वसाधारण खुला ‘ प्रवर्गासाठी जाहीर होताच शहरातील राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतला आहे . राजे गटाकडून या पदासाठी अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात असून , एका व्हॉट्सॲप 4 स्टेटसमुळे या चर्चेला मोठे बळ मिळाले आहे
आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही क्षणातच , फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा फोटो आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर केला . या कृतीकडे राजे गटाकडून उमेदवारीचा दिलेला हा पहिलाच आणि स्पष्ट संकेत म्हणून पाहिले
त्यामुळे अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत राजे गटातील चित्र आता स्पष्ट झाले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे . फलटण नगरपरिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे . राजे गटाकडून अनिकेतराजे यांचे नाव निश्चित मानले जात असताना , महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे



