सातारा जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा समिती) च्या सदस्य पदी सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री धैर्यशील उर्फ दत्ता बापू अनपट यांची अशासकीय सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी आमदार दीपक राव चव्हाण माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर माननीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या शिफारशीनुसार दिशा समितीच्या सदस्य पदी नियुक्ती झाली असून दिशा समितीचे अध्यक्ष माननीय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले सह. अध्यक्ष मा खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सदस्य खासदार नितीन काका पाटील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा सदस्य दिशा समिती व सचिव म्हणून माननीय जिल्हाधिकारी हे काम पाहणार आहेत. केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे कमिटीचे प्रमुख कामे आहेत. मुख्यता जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, म न रे गा कामे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, शिक्षण, आरोग्य व विविध योजना राबवणे. त्यांच्या निवडीचे सर्व स्थरातून अभिनंदन होत असून जि. प.सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा जि प गटात उमटवला आहे. विकास कामांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी कमिटी असून त्यांच्या निवडीचे माननीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार दीपक राव चव्हाण माननीय श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर माननीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले



