बुधवार , दिनांक १४ मे २०२५ रोजी फलटण शहरात श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा होणार असून फलटण शहरासह संपूर्ण तालुक्यातील जनतेने , कार्यकर्त्यांनी एकत्र येवून या जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे , असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे
याबाबत सविस्तर माहिती देताना श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले की , ” छत्रपती संभाजी महाराज पुतळा समितीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा फलटण शहरात उभारला आहे . संभाजी महाराजांच्या आजोळी त्यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व्हावा हा विचार पुढे आला . त्यानुसार नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून हा जन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे . ” “ या सोहळ्यादरम्यान सकाळी १० वाजून ५७ मिनीटांनी मुधोजी मनमोहन राजवाडा येथे पाळणा होईल . त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पादुका मिरवणुकीने त्यांच्या पुतळास्थळी नेण्यात येतील . त्याठिकाणी त्यांची आरती होईल ” , असे सांगून ” तहहयात हा जन्मोत्सव साजरा होत राहील असा विचार घेवून तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी व जनतेनी या सोहळ्यामध्ये एकत्र सहभागी व्हावे ” , असे आवाहनही श्रीमंत संजीवराजे यांनी केले आहे .



