फलटण : काश्मीर म्हणजे फक्त दहशतवाद हे समीकरण बदलण्यात भारतीय लष्कराला यश मिळाले असून काश्मीरला वेगवेगळ्या नजरेने पाहणे बंद झाले तर काश्मीर परिसर अजून संपन्न होईल . ‘ असे प्रतिपादन लेप्टनंट जनरल ( निवृत्त ) विनायक पाटणकर यांनी केले . ब्रिगेडियर ( निवृत्त ) प्रमथेश रैना यांनी लिहिलेल्या ‘ काश्मीर डॉन ऑफ न्यू एरा ‘ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . कर्नल विनोद मारवाह फाउंडेशन तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . मेजर जनरल ( निवृत्त ) जी . डी . बक्षी , अरुण वाखलू , कर्नल ( निवृत्त ) विनोद मारवाह , इंडस बिझनेस स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ . जयसिंग मारवाह , सैन्य दलातील निवृत्त अधिकारी यावेळी होते . पाटणकर उपस्थित होते
पाटणकर पुढे म्हणाले की , काश्मिरी पंडितांची पुन्हा वापसी होणे हे महत्त्वाचे असून त्यामुळे काश्मीरची ओळख बदलू शकेल . सैन्य दल काश्मीरमध्ये उत्कृष्ट काम करत असते . सैन्याला अनेक अडथळे येत असतात परंतु त्यावर ते मात करत सौंदर्य अबाधित ठेवत आहेत . मेजर जनरल बक्षी म्हणाले की , लष्करात मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत . मनुष्यबळ हे सर्वात महत्त्वाचे असून त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे . परंतु तसे घडत नसून तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ याची एकत्रित सांगड घातली जात आहे . काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी लष्कर दिवसरात्र राबत असते . रैना 1 म्हणाले , ‘ काश्मीर प्रदेशावर चित्रपट आले , काश्मीर मधे कायदा बदल झाला
काश्मीर मधे कायदा बदल झाला . यामुळे काश्मीर बद्दल कुतूहल निर्माण झाले असले तरी राष्ट्र घडवण्यासाठी लष्कर मोठ्या प्रमाणात काम करत आहे . श्रीनगर सतत उत्क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत असते . त्यामुळे सातत्याने काश्मीर चर्चेत असते .



