माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते – पाटील यांनी फलटण नगर पालिकेचे माजी नगरसेवक सनी अहिवळे यांच्या फलटण येथील बुद्ध या निवासस्थानी नुकतीच भेट दिली . याप्रसंगी युवा उद्योजक संग्राम अहिवळे यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माजी नगरसेवक सनी अहिवळे , संग्राम अहिवळे यांच्याबरोबर विविध विषयावर चर्चा केली . येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची मानली जाते



