फलटण :-संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा , विमानतळ , फलटण येथून बरडकडे मार्गस्थ झाल्यानंतर पालखी तळाची स्वच्छता ही जबाबदारी गेल्या अनेक वर्षापासून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध संस्था संघटना आणि नागरिकांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते . यावर्षीही मंगळवार दि . 1 जुलै रोजी सकाळी 08 वाजता पालखी तळ स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येणार आहे . या मोहिमेत फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच श्रीराम सहकारी साखर कारखाना लि . , फलटण , कृषि उत्पन्न बाजार समिती , फलटण , फलटणतालुका सहकारी दूध पुरवठा संघ लि . , फलटण , श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक , श्रीमंत सईबाई / महाराज महिला सहकारी पतसंस्था , नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटिज ट्रस्ट , फलटण , गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस येथील अधिकारी , कर्मचारी , / सभासद शेतकरी तसेच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण शाखा , क्रेडाई फलटण शाखा आणि शहर व – तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी , फलटणकर नागरीक या मोहिमेत सहभागी होणार असल्याची माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे . फलटण नगर परिषद आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून पालखीतळाची स्वच्छता आज करण्यात आली आहे , त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतानाच मुख्य पालखी तळाशिवाय विमानतळाच्या आतील बाजूला कंपाऊंड लगत असलेले प्लास्टिक पिशव्या , पेपर ग्लास व अन्य कचरा संकलित करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन ही मोहिम त्यादृष्टीने काम करणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे .



