फलटण :- आज जगभरातील ग्रंथालये समृद्ध स्वरूपात पाहायला मिळतात.त्या पाठीमागे एका गणितज्ञ व शिक्षण शास्त्रज्ञ असलेल्या डॉ.एस.आर. रंगनाथन यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी “ग्रंथालय शास्त्राचे पाच नियम” हे पुस्तक लिहून त्याचा कायदा झाल्यामुळे ग्रंथालय शास्त्राला एक नवीन दृष्टिकोन प्राप्त झाला.त्यांचे हे योगदान जगभरातील ग्रंथालय चळवळीला लाभदायक ठरल्यामुळे तेच ग्रंथालय शास्त्राचे जनक ठरतात.असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रभाकर पवार यांनी मुधोजी महाविद्यालय,फलटण येथे केले.यावेळी ग्रंथपाल प्रा.आनंद पवार,इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष कदम,वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.वैशाली कांबळे,प्रसिद्ध पुस्तक विक्रेते श्री.अमोल फडतरे,श्री.अमर घोरपडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मुधोजी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाने आयोजित केलेल्या पद्मश्री एस.आर.रंगनाथन यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा.डॉ.प्रभाकर पवार पुढे म्हणाले, ग्रंथाकार,ग्रंथवाचन ग्रंथाधिकार,वाचनवेळेचा सदुपयोग व वाढत जाणारी ग्रंथसंख्या इत्यादींच्या अनुषंगाने पद्मश्री एस. आर.रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राला नवी दिशा देऊन जगभर ती चळवळ गेल्याचे दिसते.ग्रंथालय शास्त्राला कायद्याद्वारे एक नवा दृष्टिकोन देणारी रंगनाथन यांचे कार्य अवघ्या जगामध्ये प्रसिद्ध पावले. स्वतंत्र ग्रंथालय असणाऱ्या तत्कालीन महापुरुषांनी रंगनाथन यांच्या या मूलभूत कार्याचे कौतुक केले आहे.त्यांनी ग्रंथालय शास्त्राचा पाया घातल्यामुळे तेच ग्रंथालय शास्त्राचे जनक ठरतात. प्राचार्य प्रो.डॉ.पंढरीनाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात ग्रंथपाल प्रा.आनंद पवार यांनी ग्रंथ वाचनाचे व ग्रंथ जतनाचे महत्त्व पटवून दिले.प्रथमतः यावेळी पद्मश्री एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांसोबत अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी प्रा.आनंद पवार यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
डॉ.एस.आर.रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राचा पाया घातला – प्रा.डॉ . प्रभाकर पवार
Leave a comment



