फलटण:–‘फकिरीयत’ चित्रपटाचा उदघाट्न समारंभ सोहळा फलटण येथे,माँ रुद्रात्मिका गुरुमाई, क्रियायोग मिशन फौंडेशन च्या संस्थापिका यांच्या हस्ते पार पडला फलटण च्या साधकांच्या वतीने गुरुमाई यांना काल दिं. 1/12/2025 रोजी ‘क्रियायोग भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या फकिरीयत चित्रपट उदघाटन समारंभ सोहळ्यात – संत गुरुमाई यांचे फलटण तर्फे. डॉ गुळवणी सर व डॉ गुळवणी मॅडम, डॉ माधव पोळ, डॉ अलका पोळ, डॉ प्रसाद जोशी, डॉ किरणकुमार नाळे, डॉ राजश्री नाळे, ला. मंगेश दोषी, ला. पूजा दोशी, श्री कैलास साळुंके, श्री राकेश हेंद्रे, श्री. बाबाजी काळे,डॉ सुजित अडसूळ( बारामती) ऍड. योगेश वाघ( बारामती) सर्व पत्रकार यांनी स्वागत सत्कार केला.
एक डिसेंबर 2025 रोजी सिटी प्राईड फलटण या चित्रपटात गृहात ‘फकीरियत’ चित्रपट ज्यांच्या जीवनचरित्रावर हा मूवी आहे त्या स्वतः माँ रुद्रात्मिका गुरुमाई या चित्रपटगृहामध्ये उपस्थित होत्या आणि सर्व प्रेक्षकांसोबत त्यांनी हा चित्रपट स्वतः पाहिला.
चित्रपटानंतर सर्व साडेचारशे प्रेक्षकांना त्यांनी कृपाशीर्वाद आणि दर्शन दिले. या चित्रपटगृहाची क्षमता 380 आहे परंतु 460 प्रेक्षकांनी हा मूवी आज पाहिला आणि त्यासाठी एक्स्ट्रा खुर्च्या मांडाव्या लागल्या. माँ गुरुमाई रुद्रात्मिका यांनी पत्रकार परिषदेत, दीड तास सर्वांना मार्गदर्शन केले. आणि अनेकांचे आध्यात्मिक प्रश्नावर अत्यंत सुंदर भाष्य केले. अध्यात्म म्हणजे काय? क्रियायोग म्हणजे काय? ध्यान म्हणजे काय?पाखंड म्हणजे काय?तंत्र म्हणजे काय? हे क्रियायोग नेमके कसे करायचे, त्याने आपल्या जीवनामध्ये काय काय फायदे होतात या सर्व विषयावर अतिशय सुंदर भाष्य केले. विशेषतः तरुणांना तरुणपणीच आध्यात्मिक मार्गावर येण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करून आवाहन केले.
गेल्या दहा वर्षांमध्ये प्राचीन योगीक पद्धत क्रियायोगाच्या बॅचेस पूर्ण महाराष्ट्रभर आणि काशीमध्ये त्या घेतात, मार्गदर्शन करतात.
क्रियायोग हे अत्यंत प्राचीन आहे. सर्वांगीण विकास करणारे ध्यान,प्राणायाम, मुद्रा यांचे संयोजन व प्राचीन आध्यत्मिक ज्ञान म्हणजे क्रियायोग!
उत्तराखंड, द्वारहाट, कुकुचिना येथील गुफा आश्रम संकुल व रुद्रधाम,नाशिक याच्या त्या संस्थापक आहेत.
क्रियायोग मिशन फाउंडेशनचे ध्येय जगभरातील क्रियायोग शिकू इच्छिणाऱ्या आणि ध्यान करू इच्छिणाऱ्या साधकांसाठी एक समकालीन अध्यात्मिक जागा निर्माण करणे हे आहे.
अध्यात्मिक प्रशिक्षणामध्ये क्रियायोगचे बेसिक आणि ऍडव्हान्स दीक्षा अभ्यासक्रम कर्मक्षालन यज्ञ ब्रह्मखोज शिबिर, हिमालयीन साधना शिकविल्या जातात.ही सर्व शिबिरे नाममात्र शुल्कमध्ये आयोजित केली जातात.



