पुणे -सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनी व शिवजल ग्रुपतर्फे अकराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध संकल्पनांचा शुभारंभ मुहूर्त कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील वाकड येथील टीप टॉप इंटरनॅशनल हॉटेल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. शिवजल ग्रुप गेल्या 11 वर्षापासून स्वस्तातली घरे देण्यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सर्वात कमी बजेटमध्ये घर देण्याची संकल्पना शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी केली होती. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह ( बापूसाहेब ) देशमुख, शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र चे अनिकेत घुले, इंटरनॅशनल मोटिवेशनल कोच भूपेंद्र सिंग राठोड, निर्माण डेव्हलपर्सचे चेअरमन प्रकाश चव्हाण, येवले अमृततुल्यचे नवनाथ येवले, कॅफे यू अँड मी चा संचालिका रत्नावली इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवजल ग्रुप तर्फे शिक्षण संस्था सुरू करण्याच्या संकल्पाची घोषणा करण्यात आली. तसेच विविध प्रोजेक्टचे लॉन्च करण्यात आले. यावेळी शिवजल ग्रुपचे चेअरमन म्हणून उत्तम (आबा) नाळे व व्हाईस चेअरमन रोहिदास थोपटे म्हणून यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन एस बी आय एल ग्रुपचे संचालक मच्छिंद्र धुमाळ यांनी सचिन भोसले यांचे संपूर्ण कुटुंब आई सौ. अलका भोसले,वडील रघुनाथ भोसले, पत्नी सौ शारदा भोसले, मुले शिवांजली व प्रेम यांच्या सहकार्याने केले होते. या कार्यक्रमात सामाजिक शैक्षणिक औद्योगिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनी व शिवजल ग्रुपतर्फे 11 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध प्रोजेक्टचे मराठीच्या प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक यांच्या हस्ते लॉन्चिंग उत्साहात संपन्न
Leave a comment



