By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: माजी खासदारांचा अभिनय ‘ ऑस्कर ‘ देण्यासारखा : श्रीमंत संजीवराजेंची मिश्कील टिका
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सातारा जिल्हा > फलटण > माजी खासदारांचा अभिनय ‘ ऑस्कर ‘ देण्यासारखा : श्रीमंत संजीवराजेंची मिश्कील टिका
फलटण

माजी खासदारांचा अभिनय ‘ ऑस्कर ‘ देण्यासारखा : श्रीमंत संजीवराजेंची मिश्कील टिका

Prashant Ahiwale
Last updated: November 5, 2025 3:02 pm
Prashant Ahiwale Published November 5, 2025
Share
SHARE

फलटण । दि . 4 नोव्हेंबर 2025 1 ” फलटणला काल नाटकाचा एक अंक झाला . त्यामध्ये दुधाने अभिषेक आणि रडण्याचं नाटक झालं . त्यांचा तो अभिनय ‘ ऑस्कर ‘ देण्यासारखा होता ” , अशी मिश्किल टिका सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली . महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरुन रोज नवीन राजकीय आरोप होत असताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काल दि . 3 रोजी फलटणच्या गजानन चौकात जाहीर पत्रकार परिषद घेतली होती . या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमागे विधान परिषदेचे माजी सभापती आ . श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असल्याचा जाहीर आरोप रणजितसिंह यांनी केला होता . त्याला उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेतश्रीमंत संजीवराजे बोलत होते . यावेळी आ . श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते

श्रीमंत संजीवराजे म्हणाले , ” महिला डॉक्टरांचे घडलेले प्रकरण दुर्दैवी आहे . त्यावरुन सुरु असलेले आरोप – प्रत्यारोपही दुर्दैवी आहेत . हे प्रकरण झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा रामराजेंनीच पत्रकार परिषद घेतली होती . त्यामध्ये त्यांनी केवळ सखोल चौकशीची मागणी केली होती . त्यानंतर सदर महिला डॉक्टरांचे काही लेखी खुलासे माध्यमांनी समोर आणले . त्यानंतर माजी खासदारांवर आरोप सुरु झाले . तेखुलासे पत्रकारांनी बाहेर काढले आणि ते आता रामराजेंना यासाठी जबाबदार धरत आहेत . त्यांनी या प्रकरणात रामराजेंना मास्टरमाईंड म्हणणे मुर्खपणाचे आहे . ” “ दिगंगबर आगवणे त्यांचे कार्यकर्ते होते , त्यांच्या व्यवहारात आमचा काहीही संबंध नाही . त्यांच्या कुटूंबांचा आक्रोश बाहेर येतोय त्यालाही ते रामराजेंनाच जबाबदार धरत आहेत . पण मग ज्यावेळी आगवणेंनी रामराजेंच्या विरोधात उपोषण केलं होतं त्यावेळी त्यांनी विष घेण्याचा प्रयत्न केला होता ; त्यामागे कोणाचा मास्टरमाईंड होता ? ” , असा सवालही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी उपस्थित केला . ” कोणत्याही विरोधकाला आम्ही अशा पद्धतीने डॉमीनेट केलेले नाही . लोकांचा निर्णय स्वरुकारुन आम्ही पुढे जातो . कुणालाही अकारण बदनाम करण्याची आमची संस्कृती नाही . कुठं तरी विषयांतर करुन मी त्यातला नाही ; असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे . याआत्महत्या प्रकरणातील सर्व प्रश्नांची चौकशी व्हावी एव्हढीच आमची अपेक्षा आहे . जर नार्को टेस्ट करायची असेल तर त्यांच्यावर आजवर झालेल्या सर्व आरोपांपासून व्हावी ” , असेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी स्पष्ट केले .

You Might Also Like

फलटणची बारामती करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन ऐतिहासिक फलटण शहराचा विकास साधून फलटणची वेगळी ओळख निर्माण करावी : श्रीमंत संजीवराजे ना निंबाळकर

ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव यांचे निधन

भारतीय संविधान कलम 21 अ व कोचिंग सेंटर बोर्ड नियमावली भंग करणाऱ्या शाळेनावर कार्यवाही करण्यात यावी…कामगार संघर्ष संघटणा

19 मे रोजी महिला लोकशाही दिन आयोजन

गोळेवाडी येथे विषारी मण्यार सापाच्या दुर्मीळ शिकारीचे दर्शन ; NWWS , फलटण संस्थेने ही घटना केली कॅमेरा मध्ये कैद

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
सामाजिक

ज्येष्ठ पत्रकार प्रा . रमेश आढाव सरांच्या निधनाने पत्रकार व सामाजिक क्षेत्रात मोठी हानी : शोक सभेत अनेक मान्यवरांनी व्यक्त होत वाहिली श्रद्धांजली

Prashant Ahiwale Prashant Ahiwale July 25, 2025
भारतीय टपाल विभागात 25200 पदांची मेगाभरती; 10 पास असलेल्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
पंढरपूर ते घुमाण संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे फलटण मध्ये रविवारी आगमन : मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य स्वागत : 150 सायकलस्वार सहभागी : रथयात्रा 5000 कि . मी . व सायकल वारी 2500 कि . मी . करणार 8 राज्यातून प्रवास
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सडलेल्या विचारसरणीतून आलेल्या या कुत्र्याला चौकात नागड करून ठोकायला पाहिजे
लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account