अमरावती : 14 जुन 2025
प्रहार चे नेते माजी आ.बच्चू कडू यांनी मागील 7 दिवसापासून सुरू असलेले उपोषण अखेर स्थगित केले. 20 पेक्षा अधिक मागण्या मान्य झाल्याचे सांगत हा आंदोलनाचा सर्वांत मोठा विजय असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
शेतक-यांना कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ या प्रमुख दोन मागण्या घेऊन गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अखेर आपलं उपोषण आज मागे घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जमाफीबद्दल कधीच बोलत नव्हते. पण, आपल्या आंदोलनाने, उपोषणाने त्यांना यावर बोलायला भाग पाडले.
तसेच येत्या २ ऑक्टोबरपर्यंत सरकारने कर्जमाफीची तारीख सांगावी, नाहीतर गांधीजयंतीदिनी भगतसिंह शैलीत आंदोलन करून मंत्रालयात घुसू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. आपण आंदोलन थांबवत नाही तर पुढे ढकलतोय, असे बच्चू कडू यांनी आवर्जून अधोरेखित केले.
आज मंत्री उदय सामंत व आ.अमोल मिटकरी यांनी महायुती सरकारतर्फे मध्यस्थी करीत माजी आ. बच्चु कडु यांना लेखी आश्वासन देत बच्चु कडु यांचे आज सातव्या दिवशी उपोषण तोडले.
राज्य सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, विविध प्रश्न, नुकसानभरपाई यांवर 15 दिवसात समिती गठित करुन समितीचा अहवाल आल्याबरोबर कैबिनेट बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली जाईल असेही सरकार तर्फे सांगण्यात आले आहे. यावेळी बच्चु कडु म्हणाले की आम्ही आंदोलन स्थगित केले आहे, थांबविले नाही. यानंतर आम्ही व आमच्या प्रहारचे कार्यकर्ते चार पट ऊर्जेने दिव्यांगांच्या मागण्यांसाठी सरकारवर
तुटुन पडु असा इशारा सुद्धा त्यांनी दिला
अखेर बच्चु भाऊंनी अन्नत्याग उपोषण आंदोलन मागे घेतले!
Leave a comment



