विमान अपघात झाला … खरे तर अपघात झाल्यानंतर आता जे अपघातातून वाचले ते आणि श्रद्धाळू लोक देवाच्या कृपेमुळे वाचले असे म्हणून मोकळे होतात . पण जे अपघातात गेले ते देवाच्या अवकृपेमुळे गेले असा त्याचा अर्थ होतो . देव एवढा सिलेक्टिव्ह कसा होतो ? ज्यांना तो वाचवतो ते कोणी थोर व्यक्ती असतात की काय ? पुण्यवान वगैरे ? आणि ज्यांना तो मारतो त्या व्यक्ती कनिष्ठ ● असतात की काय ? पापी वगैरे ? एवढा साधा विचार सुद्धा न करता अमुक स्तोत्र म्हटले .. अमुक मंत्र जप केला .. अमुक दैवाचा धावा केला .. म्हणून वाचलो म्हणणारे जे त्या अपघातात गेले त्यांना ते हिणवतात असा अर्थ होतो . अपघातात जे गेले त्यांना मृत्यू योग होता असे आता कोणीही ज्योतिषी म्हणू लागला तर ती थाप आहे असे समजावेअपघात याचा अर्थ तो कुणीतरी घडवून आणलेला नसतो किंवा तो पूर्वीच कोणीतरी नक्की केलेला नसतो . अपघात घडण्यामागे अनेक प्रकारची विविध भौतिक व मानसिक कारणे असतात आणि ही कारणे आपणाला लक्षात न आल्याने अपघात घडतात . प्रारब्ध , संचित , नशीब , वगैरे अपघात झाल्यानंतरच्या तयार झालेल्या संकल्पना असतात . एखाद्याला रोगाचे निदान होणे हे प्रारब्ध नसते . तसेच अपघात घडणे म्हणजे संचित नशीब वगैरे काही नसते . ती एक विश्वात घडणारी नेहमीच अपघाती घटना असते . मात्र अशा घटनांचे भांडवल करणारे दैव , भविष्य , देव , वगैरे गोष्टींची जोडून लोकांना आणखी आंधळे बनवतात आणि गंमत अशी असते की .. अपघात झाल्यानंतरच हे सगळे जागे होतात . अपघात होण्यापूर्वी ते कधीही पूर्वसूचना देत नाहीत . ज्यामुळे अपघात टाळता येईलवैचारिक क्षेत्रात असलेली ही सगळी भोंदूगिरी आहे एवढे लक्षात ठेवले तरी पुरे !
डॉ . प्रदीप पाटील सर Dr. Pradeep Patil



