सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , संस्कार भारती या संस्थांमधून कार्यरत असणारे संदीपकुमार जाधव हे भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या माध्यमातून सन 2014 – 15 पासून भारतीय जनता युवा मोर्चामध्ये फलटण शहराध्यक्ष म्हणून सक्रीय झाले . त्यानंतर सुमारे दीड वर्षापूर्वी त्यांच्यावर युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती . युवकांचे संघटन , पक्षाची आंदोलने , मोर्चे , लोकसभा व विधानसभा निवडणूका यामध्ये संदीपकुमार जाधव यांनी सक्रीय योगदान दिले आहे . माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वात कार्यरत असणारे संदीपकुमार जाधव यांनी नेतृत्त्वावर कोणतीही नाराजी नसताना स्थानिक अंतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिला आहे कां ? भाजपच्या राजीनाम्यानंतर आता ते कोणती राजकीय वाट पकडणार ? याबाब उलट – सुलट चर्चा त्यांच्या निकटवर्तीयांकडुन केली जात आहे



