फलटण (प्रतिनिधी) फलटण नगरपरिषदेच्या आरोग्य निरीक्षक पदी श्री मुकेश पुष्पा विनायक अहिवळे …… कराड नगरपरिषद येथे आरोग्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असणारे, कराड शहरास स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२०२५ मध्ये संपूर्ण देशात पन्नास हजार ते तीन लाख लोकसंख्या कॅटेगरी मध्ये द्वितीय स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावून सदरचा पुरस्कार देशाच्या महामहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते स्विकारण्यासाठी दिल्ली येथे नगर विकास राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य व कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या समवेत मंचावर उपस्थित राहणारे आरोग्य निरीक्षक श्री मुकेश पुष्पा विनायक अहिवळे यांची बदली फलटण नगरपरिषद येथे विशेष बदली आदेशान्वये झाली आहे. तरी आता फलटण शहराचाही स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशपातळीवर नावलौकिक होईल अशी अपेक्षा नवनियुक्त आरोग्य निरीक्षक यांच्याकडून फलटण शहरवासीये व्यक्त करीत आहे…



