🔹विद्यार्थ्यांनी सत्य शोधन्याची सवयी लावली पाहिजे : प्रबुद्ध सिद्धार्थ
फलटण (11 एप्रिल) महात्मा फुलें यांच्यामुळे बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची दारे खुली झाली. आपल्याला शालेय शिक्षण मिळू लागले. या मिळालेल्या सुवर्ण संधिचा उपयोग सत्य शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. हीच खरी महात्मा फुलेंना आदरांजली ठरेल. असं संस्थाध्यक्ष सिद्धार्थ प्रबुद्ध म्हणाले. ते महात्मा फुले जयंती निमित्त प्रबुद्ध विद्याभवन मध्ये बोलत होते.
यावेळी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल प्रबुद्ध विद्याभवनच्या शिक्षिका वनिता कांबळे/मोरे याचा सत्कार विद्याभवनच्या वतिने करण्यात आला.
याप्रसंगी काबळे मँडम यांनी विचार व्यक्त केले. तर विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या बद्दल भाषणे केली.
सुत्रसंचालन मुख्यध्यापक यशवंत कारंडे व कार्यक्रम व्यवस्था अन आभार महादेव गुंजवटे यांनी व्यक्त केले



