फलटण : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फलटणच्या राजकारणात आज प्रभाग क्रमांक एक मधील सोमवार पेठ येथील युवा नेते सतीश जाधव यांनी आपल्या शेकडो निष्ठावान कार्यकर्त्यांसह श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राजे गटात प्रवेश केला . हा प्रवेश म्हणजे फलटण शहरातील एका प्रमुख प्रभागावर राजे गटाने मजबूत पकड मिळवल्याचे स्पष्ट संकेत आहेत . प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन सतीश जाधव यांच्या या निर्णायक प्रवेशाने राजे गटाचे शहरातील बळ कमालीचे वाढले आहे . या भव्य प्रवेशावेळी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि युवा नेते श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती . राजे गटाच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी सतीश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पुष्पहार घालून पक्षातउत्स्फूर्त स्वागत केले . सतीश जाधव यांची भूमिका राजे गटात प्रवेश केल्यानंतर सतीश जाधव यांनी बोलताना , श्रीमंत रामराजे आणि संजीवराजे यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे . केवळ विकास हेच उद्दिष्ट ठेवून मी आज राजे गटात सामील झालो आहे . प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आता अधिक ताकदीने काम करु , अशी भूमिका स्पष्ट केली .



