फलटण :-येथे गुरुवार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गजानन चौकात सांगता सभा होणार आहे . मंत्री गुलाबराव पाटील , शंभूराज देसाई , योगेश कदम , आ . निलेश राणे उपस्थित राहणार आहेत .
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील गजानन चौक येथे सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे . या सभेस राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील , शंभूराज देसाई , योगेश कदम तसेच आमदार निलेश राणे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहे .नगरपरिषद निवडणूक प्रचाराच्या सांगतेनिमित्त ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे . या सभेत महायुतीचे नेते मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत .या सांगता सभेस मंत्री गुलाबराव पाटील , मंत्री शंभूराज देसाई , राज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .ही सांगता सभा गुरुवार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता गजानन चौक , फलटण येथे पार पडणार आहे .सभेच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी गाड्या घेऊन येऊ नयेत , तसेच आवश्यक असल्यास नगरपालिकेच्या पार्किंगमध्ये किंवा मुधोजी क्लब व अशोका हॉटेल परिसरात वाहने लावावीत , असे आवाहन करण्यात आले आहे .फलटण शहरातील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी या सांगता सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे , असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .



