फलटण – फलटण तालुक्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होऊन नुकसान झाले असताना जनतेच्या मदतीसाठी आणि दिलासा देण्यासाठी फक्त निवडणुकीपुरते उगविणारे अवकाळी नेते दिसलेच नसल्याने त्यांचे स्वार्थी ,मतलबी राजकारण उघडे पडले आहे.अडचणीचे काळात जनतेला वाऱ्यावर सोडणारी ही अवकाळी नेतेमंडळी कोठे आहेत असा प्रश्न जनतेला पडला आहे.
फलटण तालुक्यात तीन दिवसापूर्वी सलग चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांची घरे उध्वस्त झाले असून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेकांची जनावरे दगावली असून आर्थिक नुकसानीमुळे आपतग्रस्त नागरिक चिंतेत आहेत. यावेळी आपतग्रस्त नागरिकांच्या मदतीला तातडीने
विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ,आ. सचिन पाटील, माजी आ दीपक चव्हाण,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर,माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर,फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके ,धनंजय साळुंखे पाटील त्यांचे कुटुंबीय,कार्यकर्ते आणि हे पावसात धावून आले लोकांना दिलासा दिला खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुद्धा ठिकठिकाणी आपतग्रस्तांच्या भेटी घेऊन दिलासा दिला.
नेतेमंडळीप्रमाणेच प्रशासकीय यंत्रणा सुद्धा मदतीसाठी सतर्क झाली होती वरील नेते मंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते जनतेच्या वारंवार संपर्कात होते एकीकडे ही नेते मंडळी जनतेची मदत करत असताना दुसरीकडे केवळ निवडणूका पुरते स्वतःचे महत्व वाढवून घेणारी काही अवकाळी नेते फिरकलेच नाहीत ते कोठे आहे याचा थांग पत्ता सुद्धा जनतेला लागला नाही. फलटण तालुक्यात निवडणूक आली की स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्यासाठी एखादा मेळावा घ्यायचा किंवा वरिष्ठ नेते मंडळींना घरी बोलवायचे,कार्यकर्त्यांना बोलवायचे, आपले महत्त्व गटाचे महत्व आणि वाडवडीलांची पुण्याई पटवून द्यायची असा काहींनी गोरख धंदा सुरू केला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने पाठिंबा देण्यासाठी आर्थिक तडजोड करायची. भाषणे करायची ,निवडणुकीत प्रचारात सहभागी होऊन निवडणूक झाली की पुन्हा गायब व्हायचे असली तऱ्हा काही नेते मंडळींची सुरू आहे. अडचणीच्या काळात स्वतः कधी खिशातील पाच पैसे जनतेसाठी किंवा कार्यकर्त्यांसाठी खर्च करण्याची लायकी सुद्धा ही मंडळी दाखवत नाहीत. यांच्याबरोबरच लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीला इच्छुक असणाऱ्या अनेकांनी निवडणूका पूर्वी मोठा खर्च केला ,तालुक्याच्या विकासाचा मोठ कळवळा दाखविला मात्र नंतर ते गायब झाले आहेत.
फलटण तालुका अडचणीत असताना साधी विचारपूस सुद्धा या नेते मंडळींनी केलेली नाही.तालुक्याला अडचणीचे काळात वाऱ्यावर सोडणाऱ्या या अवकाळी नेत्याबद्दल जनतेतून नाराजी व्यक्त होत आहेतच पण असल्या प्रवृत्तींना कोणत्याही नेतेमंडळींनी यापुढे थारा देऊ नये अशा भावना व्यक्त होत आहे.
निळ्या टोपीतील आंबेडकरी भीमसैनिक : खंडू कृष्णा रणदिवे निळी टोपी ही आमची अस्मिता आहे . हा आमचा स्वाभिमान आहे . अखेरच्या श्वासापर्यंत ही निळी टोपी स्वाभिमानाने , अभिमानाने डोक्यावर राहील . ही आमच्या भीम बाबांची निशाणी आहे . प्राण गेला तरी डोक्यावरून काढणार नाही . – खंडू कृष्णा रणदिवे खंडू मामा रणदिवे अगदीच कमी उंची , देह सडसडीत , डोक्यावर निळी टोपी , अंगात तीन गुंडयांचा शर्ट , पांढरं शुभ्र धोतर , जाड भुवया असा ठेंगणा देह पण करारी नजर हे खंडू मामांचे खास वैशिष्ट होते . मात्र हा देह कधीही कुणापुढे झुकला नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कुणापुढे हात पसरला नाही . आंबेडकरी विचाराने प्रभावीत झालेला भिमसैनिक आज आपल्यात नाही . तो काळाच्या पडद्याआड गेला पण कार्य कर्तृत्वाने कायम जनसामान्यात राहिला . अखेरच्या क्षणापर्यंत कष्ट करीत आंबेडकरी विचार त्यांनी जपला . नाही बंगला , गाडी की गर्भ श्रीमंती मिळवली आंबेडकरी समाजाच्या हृदयातील कायम त्यांनी श्रीमंती कमावली . खंडू मामांचे हे कार्य आर.टी. रणवरे यांच्या सारखे
होते . दोघांनीही मरेपर्यंत स्वाभिमानाची निळी टोपी आयुष्यभर डोके डोक्यावर घातली.त्यांच्यासारखी निष्ठावंत माणसे होती म्हणूनच आंबेडकरी चळवळ संपूर्ण राज्यात जाऊन पोहोचली . खंडू मामा रणदिवे यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला . आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांची औंध या ठिकाणी मिरवणूल काढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता . नामांतर लढय़ात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला . दलित पॅन्थरच्या चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला . भूमिहीन शेतकरी व शेतमजुरांच्या आंदोलनात ही ते आघाडीवर होते . आयुष्यात त्यांना खूप काही कमवता आले नसेल ही पण आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये आपले एक अढळ स्थान निर्माण केले . आजच्या सारखा प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया एवढा जागृत नव्हता तेव्हा ही माणसं निष्ठेने पदरमोड करून आंबेडकरी चळवळीसाठी झटत होती . मान.खा. रामदास आठवलें यांच्या अनेक सभांमध्ये स्टेजवरती खंडू मामा उपस्थित असायचे . त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये आपली मनोगते पोटतिडकीने मांडली.तत्कालीन केंद्रीय मंत्री रामविलास
पासवान जेव्हा फलटला आले होते तेव्हा त्यांच्याही सभेमध्ये हा निळ्यातील भीमसैनिक स्टेजवरती उपस्थित होता . खंडू मामा रणदिवे यांनी आपला काही काळ निंबळक येथे पाहुण्यांकडे घालवला.त्यानंतर त्यांनी फलटण सर्कल येथील साखरवाडी मळ्यात शेती महामंडळात पहारेकरी म्हणून काम केले . त्यांच्यामधील प्रामाणिकपणा व निष्ठा पाहून त्यांना अनेक ठिकाणी पहारेकरी म्हणून ठेवले.शेती महामंडळात कंत्राटी पद्धतीने दोन वर्षे काम केल्यानंतर ते सेवेत कायम झाले . सनी तिथेच काम केले . सेवानिवृत्तीनंतर ते औंध येथे गेले तिथे पाच वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिले . तिथून पुढे ते चौधरवाडी येथे आले . त्याही ठिकाणी पाच वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला.त्या ठिकाणी त्यांनी अनेक लोकोपयोगी विकासकामे मार्गी लावली . त्यांनी अत्यंत प्रयत्न करून फलटण सर्कल रोड मंजूर करून घेतला . डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी निधीची तरतूद करून घेतली . रा . सू . गवई , ॲडव्होकेट बी.सी कांबळे , दादासाहेब रूपवते , आर . डी . भंडारे , यांच्यासह प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर ,मा रामदास आठवले माईसाहेब आंबेडकर इत्यादी प्रमुख आंबेडकरी नेते यांच्याशी त्यांचा सहवास व संपर्क होता . ते त्यांना भेटण्यासाठी जायचे . त्यांना यासाठी कोणत्याही मध्यस्थीची गरज नव्हती.त्यांच्यातील प्रामाणिक कार्यकर्ता व निष्ठा यामुळे त्यांना कोणीही अडवत नव्हते . आंबेडकरी चळवळी बरोबर आपला उदरनिर्वाह करण्यासाठी बोरावके फार्म , निंबाळकरांच्या धुळदेव येथील फॉर्मवर प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले . निंबकरांच्याकडे ही त्यांनी काम केले.त्यांना पांडुरंग गौतम उत्तम व शांताबाई ( मैना ) अशी मुलं झाली . रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हय़ाच्या कार्यकारिणीवर ही ते कार्यरत होते . अशी निष्ठावंत माणसं आज सापडत नाहीत . स्वार्थाने बरबटलेली माणसं खंडीने सापडतील पण खंडूमामा रणदिवे हे रसायन काही वेगळंच होतं . डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या मुशीत तयार झालेले खंडूमामा येणारे अनेक पिढ्यांना दिशा देण्याचं काम करतील यात तीळमात्र शंका नाही . त्यांच्यासारख्या भीम सैनिकांमुळेच आज आंबेडकरी विचार जिवंत आहे . ते झटले समाजासाठीच . आयुष्याच्या ‘ अखेरच्या क्षणापर्यंत कधीच त्यांनी नवी टोपी काढली नाहीत्यांची शिकवण पुढील पिढीला दिशादर्शक ठरेल
आयु.सोमीनाथ पोपट घोरपडे सामाजिक कार्यकर्ता मु.पो.सासकल ता . फलटण जि.सातारा मो.नं .७३८७१४५४०७



