फलटण (२३एप्रिल) 🔹डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ८६ वर्षापुर्वी ” अस्पृश्य प्रजा परिषद ” फलटण मध्ये घेऊन येथील समाजामध्ये जाग्रुती व स्फुर्ती निर्माण केली होती.*
🔹बाबासाहेबांनी घेतलेल्या प्रजा परिषदेचा इतिहास प्रबुद्ध विद्याभवन चे मुख्याध्यापक कारंडे यांनी सांगितला. तसेच भीमजयंती समितीचे मोहिते यांनी विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करावा.असा संदेश दिला.
🔹भीमस्फूर्ती दिना निमित्ताने प्रबुद्ध विद्याभवने भीमस्फूर्ती भूमी विहारामध्ये कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये ध्यानसाधना चित्रकला घेण्यात आली.
🔹यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने बुद्ध वंदना घेऊन प्रबुद्ध च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट दिले.
☝️प्रबुद्ध व भीमजयंती समितीने आंबेडकरी प्रजा परिषदेच्या स्मृती जाग्रुत ठेवल्या☝️
Leave a comment



