फलटण प्रतिनीधी : ठाकुरकी ता फलटण येथे संदीप मनोहर रिटे ( वय ३५ वर्षे ) या युवकाचा खून करून मृतदेह अर्धवट अवस्थेत पुरल्याचे आढळून आला आहे फलटण शहर पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार डोक्यास व गळ्यावर गंभीर जखमा करून तसेच गुप्तांग अर्धवट कापलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने फलटण व परिसरात खळबळ उडाली असून मृत संदीप रिटे यांच्या कथित खुनाचा तपास सुरू आहेफलटण येथील नाना नाणी पार्क विमानतळा शेजारी मृत संदीप गेली महिनाभरा पासून कामाला होते तसेच मृत संदीप यांच्या पत्नी सोनाली या एका आठवड्यापासून तिथेच कामाला होत्या सोमवारी असणारी सुट्टी मंगळवारी घेऊन दि १० रोजी पत्नीस माहेरी सोडून मृत संदीप कामाला गेले परंतू सायंकाळी सात वाजले तरी संदीप घरी न पोहचल्याने व दि ११ रोजी संदीप कामावर येणार का असे विचारल्यावर ते काल पासून घरी आले नसल्याने व कामावरून काल साडेपाच वाजता सटल्यानेशोध घेतला परतू तो कोठे हि न मिळाल्याने फलटण शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी कुटुंबीय व त्याची पत्नी गेली होती . याच वेळी ठाकुरकी ता फलटण गावच्या हद्दीत एक अज्ञात युवकाचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता संदीप व त्यांचे कुटुंबीय घटनास्थळी गेले असता तो मृतदेह संदीप यांचाच असल्याची खात्री पटल्याने व संदीप याच्या डोक्यास , गळ्यावर खोलवरजखमा होवुन रक्तस्त्राव झाल्याचे दिसत होते . तसेच त्यांचा गुप्त भाग अर्धवट कापुन रक्तश्राव झाला होता . त्याठिकाणी संदीप यांची सुझुकी कंपनिची काळ्या रंगाची व त्यावर निळ्या रंगाचा पट्टा असलेली मोटार सायकल MH 12 BC 1159 मोटार सायकल होती . याप्रकरणी संदीप यांची पत्नी सोनाली संदिप रिटे ( रा . ठाकुरबुवा मंदिर शेजारी , ठाकुरकी , ता . फलटण , जि . सातारा ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातव्यक्तिविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास फलटण शहर पोलिसांकडून सुरू आहे अद्याप या प्रकरणी कोणासही अटक करण्यात आली नाही . घटनास्थळावर फॉरेन्सीसिक लॅब व डॉग स्कॉड पथक येऊन गेले असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवलेआहे.अधिक तपास फलटण पोलीस करीत आहेत



