फलटणचे नातू या नात्याने आपण छत्रपती संभाजी महाराजांकडे पाहत असतो . मोठ्या भावनेने आणि श्रद्धेने हा पुतळा आपण बसवलेला आहे . त्यामुळे याठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार , अस्वच्छता होणार नाही याची काळजी सर्वांनी घेवून या संपूर्ण परिसराचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी ” , असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले .
छत्रपती संभाजी महाराजांपासून स्फूर्ती मिळावी म्हणून पुतळा समिती स्थापन करुन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमच्या पुढाकारातून हा पुतळा बसवण्यात आला . या ठिकाणी लाईटची सोय लवकरच होणार आहे . हा परिसर स्वच्छ आणि सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच्या घटकेला पुतळा समितीकडून गरज असलेली सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे . या संपूर्ण परिसराचं पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध असलं पाहिजे . कुठलाही अनुचित प्रकार याठिकाणी होऊ नये याची जबाबदारी सर्वांनीच घ्यावी . पुतळ्यासमोरील भिंत पाडून या ठिकाणी आकर्षक सुशोभीकरण करण्यात येणार आहे . त्याची परवानगी नगरपरिषदेकडून मिळाल्यानंतर लवकरच तेही काम पूर्ण होणार आहे ” , असेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी स्पष्ट केले .



