फलटण : – फलटणमध्ये गेली अनेक वर्षे राजश्री शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि सामाजिक एकात्मतेने साजरी करणारे समाजसेवक बापूसाहेब जगताप यांना यंदाच्या “राष्ट्रीय होउ20 शाहू 2005′ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरवर्षी २६ जून रोजी रोजी ते आपल्या संस्थेमार्फत राजश्री शाहू महाराजांच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करतात. किंवा मिरवणुकीत शाहू महाराजांचा पुतळा, इतर महापुरुषांचे फलक, झांज पथक, बँजो, लेझीम पथक, घोडेस्वारी इत्यादी पारंपारिक व स्फूर्तिदायक प्रकार साजरे केले जातात. त्यांच्या सामाजिक समता आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव म्हणून त्यांना कोल्हापुरातील मानवतावादी सांस्कृतिक चळवळीतील ‘दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील “राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार 29 जून 2025 रोजी कोल्हापुरातील राजश्री शाहू मेमोरियल बिल्डिंगमध्ये प्रदान करण्यात आला. ,पुरस्कार प्राप्तीनंतर राजकीय , सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . समाजासाठी शाहू महाराजांचे विचार जपत शाहूंची जयंती साजरी करणाऱ्या आयु . बापूसाहेब जगताप यांच्या कार्याचा हा योग्य सन्मान ठरला आहे .



